हवेली तहसीलदार कार्यालयातर्फे ‘सेवा पंधरवडा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवेली तहसीलदार कार्यालयातर्फे ‘सेवा पंधरवडा’
हवेली तहसीलदार कार्यालयातर्फे ‘सेवा पंधरवडा’

हवेली तहसीलदार कार्यालयातर्फे ‘सेवा पंधरवडा’

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २१ : हवेली तहसीलदार कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमाचे श्रीरामनगर (ता. हवेली) येथील नक्षत्र मंगल कार्यालयात उद्घाटन झाले. हा सेवा पंधरवडा २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत नागरीकांना सरकारी दाखले, शासकीय योजना तसेच, विविध सरकारी कामांची पूर्तता होण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध असणार आहे.

या वेळी कृषी, महसूल, महावितरण, आरोग्य, पशुसंवर्धन आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या कामकाजाच्या दप्तरासह उपस्थित होते. शिधापत्रिका, सातबारा, विजबिले, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, विविध शासकीय योजना, कृषी व आरोग्य विषयाशी निगडित अनेक कामे या ठिकाणी करण्यात आली. हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील म्हणाल्या, ‘‘येत्या २ ऑंक्टोंबरपर्यंत हा सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या विविध कार्यालयात नागरिकांना त्यांची विविध सरकारी कामे करून मिळतील. त्यासाठी विविध शासकीय विभागाचे कर्मचारी संबंधित कार्यालयात उपलब्ध असतील.’’ हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, हवेलीचे मंडल कृषी अधिकारी एस. पी. कटके, नसरापूर महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे, कात्रजचे मंडल अधिकारी एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01085 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..