खेड शिवापूरला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड शिवापूरला 
पावसाने झोडपले
खेड शिवापूरला पावसाने झोडपले

खेड शिवापूरला पावसाने झोडपले

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. १७ : खेड शिवापूर (ता. हवेली) परिसराला सोमवारी (ता. १७) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. सुमारे अडीच तास झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील जनजीवन विस्कळित झाले. तसेच, भात आणि टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाले.
सोमवारी सकाळपासूनच या भागात ढगाळ वातावरण होते. त्यात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. सलग एकसारखा सुमारे अडीच तास पाऊस पडत होता. पावसाचा जोर इतका मोठा होता की अवघ्या काही मिनिटात या भागातील रस्ते जलमय झाले. पुणे-सातारा रस्त्यावरील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेक गावातील ओढ्यांना पूर आले. वेळू, कोंढणपूर फाटा, शिवापूर आदी ठिकाणी दिवाळीनिमित्त बाजारपेठ भरली आहे. या जोरदार पावसाने येथील व्यावसायिक विक्रेते यांची धांदल उडाली. या पावसाने मोहरात आलेल्या व काढणीस आलेल्या भात पिकांचे आणि टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाले.