अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिवापुरातील आरोपीस जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार;
शिवापुरातील आरोपीस जन्मठेप
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिवापुरातील आरोपीस जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिवापुरातील आरोपीस जन्मठेप

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २१ : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दोन लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली. दिनेश हरी भालेराव (वय २६, रा. शिवापूर, ता. हवेली), असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी दिनेश भालेराव याने अल्पवयीन मुलीला भाजी आणण्याच्या बहाण्याने डोंगरात नेऊन वारंवार बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दिनेश भालेराव याला अटक केली होती. त्याला शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या खंडपीठाने भालेराव याला जन्मठेप आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे वकील किरण साळवी यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्यात प्रभारी अधिकारी सचिन पाटील, केस अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम आणि पोलिस कर्मचारी मंगेश कुंभार यांनी कामकाज पाहिले.