श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याचे काम रखडले
श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याचे काम रखडले

श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याचे काम रखडले

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १ : हायब्रीड ऑन्यूटी तत्वावर करण्यात आलेल्या कोंढणपूर फाटा ते सिंहगड किल्ला या रस्त्यावरील श्रीरामनगर ते शिवापूर हा सुमारे तेराशे मीटरचा टप्पा अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. या रस्त्याचे काम सुमारे चार वर्षांपासून रखडले आहे. परिणामी कोंढणपूर परिसरातील स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांची गैरसोय होत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हायब्रीड ऑन्यूटी अंतर्गत २०१८ साली कोंढणपूर फाटा ते सिंहगड किल्ला या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. या रस्त्यावरील श्रीरामनगर ते शिवापूर वाडा हा सुमारे तेराशे मीटरचा टप्पा वगळता बाकी रस्त्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. मात्र श्रीरामनगर ते शिवापूर वाडा या टप्प्यातील रस्त्याचे काम चार वर्षांनंतरही अपूर्ण आहे. या भागात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून येथून ये-जा करताना स्थानिक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या टप्प्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता होईल तेव्हा होईल किमान या खड्ड्यांची डागडुजी तरी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गेल्या चार वर्षांपासून येथील रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच या रस्त्यावरील खड्डेही लवकर बुजवावेत.
- सतीश दिघे, सरपंच, शिवापूर

शिवापूर रस्त्याचे काम करणाऱ्या एजन्सीकडून हे काम काढून घेऊन दुसऱ्या एजन्सीकडून करून घेण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर या रस्त्याचे काम करण्यात येईल. तोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजविण्यात येतील.
- अजय भोसले, कार्यकारी संचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग

00917