शिवापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा
शिवापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा

शिवापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २८ : शिवापूर (ता. हवेली) येथील ज्ञान प्रबोधिनी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. या वर्षी या केंद्रास चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याने या केंद्राच्या पहिल्या दहा तुकड्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षांनी सर्व विद्यार्थी एकमेकांना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यात आपण इतक्या वर्षात केलेली प्रगती प्रत्येकालाच इतरांना व शिक्षकांना सांगायची उत्सुकताही होती. मेळाव्याची सुरुवात सर्व प्रशिक्षण केंद्र बघण्याने झाली. नव्याने तयार केलेल्या कार्यशाळा, नवीन वर्ग सर्व विद्यार्थ्यांना माहितीसकट बघता आले. या वेळी प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. ज्या वर्गात जवळपास चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी शिकत असत त्याच वर्गात आज सर्वांसमोर बोलणे सर्वांनाच अभिमानास्पद वाटत होते. सध्या केंद्रात सुरु असलेल्या प्रयोगांविषयी व केंद्राच्या पुढच्या वाटचालीविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास संजीव तागडे, मितेश आचवल, किरण कुलकर्णी व इतर अध्यापक वर्ग उपस्थित होते.