Fri, Feb 3, 2023

शिवापूरात माजी विद्यार्थी मेळावा
शिवापूरात माजी विद्यार्थी मेळावा
Published on : 28 November 2022, 12:38 pm
खेड-शिवापूर, ता. २८ : शिवापूर (ता. हवेली) येथील ज्ञान प्रबोधिनी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या वर्षी या केंद्रास चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याने या केंद्राच्या पहिल्या दहा तुकड्यांसाठी हा मेळावा आयोजित केला होता.
या वेळी माजी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण केंद्र व नव्याने तयार केलेल्या कार्यशाळांना भेट दिली. सध्या केंद्रात सुरु असलेल्या प्रयोगांविषयी व केंद्राच्या पुढच्या वाटचालीविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास संजीव तागडे, मितेश आचवल, किरण कुलकर्णी व इतर अध्यापक वर्ग उपस्थित होते.