खेड-शिवापूरमध्ये अतिक्रमणे हटविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-शिवापूरमध्ये अतिक्रमणे हटविली
खेड-शिवापूरमध्ये अतिक्रमणे हटविली

खेड-शिवापूरमध्ये अतिक्रमणे हटविली

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १ : पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) हद्दीत असलेली अतिक्रमणे हटविण्यास ''एनएचएआय''ने गुरुवारी सुरुवात केली. पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या या कारवाईत गुरुवारी १० हुन अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली. पुढील चार दिवस ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सहा पदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा यापूर्वीच हद्दनिश्चिती करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ''एनएचएआय''च्या या संपादित जागेत अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली होती. त्यात काही व्यावसायिकांची बांधकामे, होर्डिंग, फलक, चहाच्या टपऱ्या यांचा समावेश होता.

अखेर गुरुवारी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात खेड-शिवापूर टोल नाक्यापासून शिंदेवाडीच्या दिशेने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. ''एनएचएआय''चे उपव्यवस्थापक अंकित यादव, भूसंपादन समन्वयक अधिकारी लक्ष्मण पाटील, राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आदी यावेळी उपस्थित होते.
-----------------
कारवाईसाठी वापरण्यात आलेली यंत्रणा
----------------------
जेसीबी - २
पोकलेन - १
क्रेन - २
रुग्णवाहिका - १
पेट्रोलिंग वाहने - २
अभियंते - १०
कामगारांचा सहभाग - ३०
-----------------------------------

- कुठे झाली कारवाई ः खेड-शिवापूर टोलनाका ते पुणे बाजूकडील रस्ता
- गुरुवारी हटविलेली अतिक्रमणे- १०
- कारवाई किती दिवस चालणार ः पुढील ४ दिवस
---------------------------
इन्फोबॉक्स १
---------------------
स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात
पुणे-सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सुरू होती. त्यामुळे काल बुधवारपासून (ता. ३०) अनेक नागरिकांनी नुकसान होऊ नये, याची दक्षता घेऊन ही अतिक्रमणे स्वतःहून काढण्यास सुरुवात केली होती.
---------------------------
इन्फोबॉक्स २
----------------
प्रशासनाने घ्यावी दक्षता
यापूर्वीही अनेकदा पुणे-सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झालेली आहे. मात्र, कारवाई होऊन काही दिवस होताच पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमणे उभी राहतात. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविल्यानंतर सदर ठिकाणी अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता ''एनएचएआय''ने घेतली पाहिजे.
------------------------------------------
कोट
-------------------
‘एनएचएआय''ने पूर्वी अतिक्रमणे हटविली त्यावेळी साडेसदतीस मीटर अंतरापर्यंत हद्द निश्चिती सांगितली होती. मात्र, यावेळी ४२ मीटरपर्यंत हद्द असल्याचे अतिक्रमणे हटविताना सांगण्यात आले. ४२ मीटरचा कसलाही उल्लेख नोटिशीमध्येही नव्हता. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. -प्रदीप वनपत्रे, -हॉटेल व्यावसायिक
----------------------
रस्त्याची हद्द नक्की किती मीटरआहे, हे ''एनएचएआय''ने एकदा निश्चित करावे. कारण प्रत्येकवेळी त्यांचे हद्द निश्चितीचे अंतर
बदलत असल्याने त्यात आमचे नुकसान होत आहे. -राजेंद्र
गोगावले, शेतकरी
--------------------------
‘एनएचएआय''च्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘एनएचएआय'' हद्दीत असलेली अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. -अमित भाटीया,
व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रस्ता
------------------------------
खेड-शिवापूर (ता. हवेली) : येथील पुणे-सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास ''एनएचएआय''ने केलेली सुरवात.