शिंदेवाडी येथे महामार्गावर १८ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदेवाडी येथे महामार्गावर
१८ लाखांचा गुटखा जप्त
शिंदेवाडी येथे महामार्गावर १८ लाखांचा गुटखा जप्त

शिंदेवाडी येथे महामार्गावर १८ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १२ : शिंदेवाडी (ता. भोर) येथे पुणे-सातारा रस्त्यावर अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारे एक ट्रक आणि दोन टेम्पो राजगड पोलिसांनी सोमवारी (ता. १२) सकाळी ताब्यात घेतले. या वाहनांतील सुमारे १८ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अन्वर शरफुद्दीन शेख (वय ३५, रा. गंजपेठ, पुणे), शेरा रमझान खान (वय ३०, रा. मध्यप्रदेश), रफिक शेख (रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) आणि मयूर अग्रवाल (रा. पुणे), अशी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारा टेम्पो पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी गावच्या हद्दीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याबरोबर राजगड पोलिस ताबडतोब सदर ठिकाणी हजर झाले. त्यावेळी त्याठिकाणी दोन टेम्पो आणि एक ट्रक उभा असल्याचे दिसून आले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची पोती आढळून आली. पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेऊन त्या वाहनांतील संबंधितांना ताब्यात घेतले. या वाहनातील मालाची तपासणी केली असता सुमारे १८ लाख रुपयांचा गुटखा त्यात आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणातील तीन वाहने आणि गुटख्याची पोती ताब्यात घेतली. तसेच, राजगड पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.