
गोगलवाडीत ९० टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
खेड-शिवापूर, ता. १८ : हवेली तालुक्यातील गोगलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी सुमारे ९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे मंगळवारी (ता.२०) स्पष्ट होईल.
गोगलवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. सात ग्रामपंचायत सदस्य आणि एक सरपंच या पदासाठी रविवारी मतदान झाले. गोगलवाडी ग्रामपंचायतीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे ९० टक्के मतदान झाले. त्यात ५२४ पुरुष मतदारांनी तर ४७३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत सरपंचपद थेट जनतेतून आणि सर्वसाधारण वर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी चार वेगवेगळ्या पॅनेलकडून ४ महिला उमेदवार रिंगणात होत्या. तर सात ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकूण १८ जण रिंगणात होते. रविवारी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मंगळवारी (ता.२०) स्पष्ट होईल.