खेड-शिवापूर परिसरास झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-शिवापूर परिसरास झोडपले
खेड-शिवापूर परिसरास झोडपले

खेड-शिवापूर परिसरास झोडपले

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १६ : अवकाळी पावसाने गुरुवारी खेड-शिवापूर परिसराला झोडपून काढले. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आंबा, गहू, ज्वारी, हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शिवापूर भागात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर वातावरणात उकाडाही वाढला होता. त्यातच दुपारी तीन नंतर अचानक मोठ्या प्रमाणात ढग जमून पावसाला सुरुवात झाली. या परिसरात सुमारे एक तासभर जोरदार पाऊस झाला.
पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला. मात्र शेतकरी वर्ग आणि वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. अनेक वीट व्यावसायिकांच्या विटा भिजल्याने नुकसान झाले. तर आंबा, गहू, हरभरा, ज्वारी, टोमॅटो, कांदा या पिकांचेही नुकसान झाले.