कोंढणपूरच्या सरपंचांविरुद्ध अविश्र्वास ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढणपूरच्या सरपंचांविरुद्ध अविश्र्वास ठराव मंजूर
कोंढणपूरच्या सरपंचांविरुद्ध अविश्र्वास ठराव मंजूर

कोंढणपूरच्या सरपंचांविरुद्ध अविश्र्वास ठराव मंजूर

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. २१ : कोंढणपूर (ता.हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच तृप्ती नवनाथ मुजुमले यांच्याविरोधातील अविश्वास ठराव सोमवारी (ता. २०) ७ विरुद्ध १ अशा फरकाने मंजूर झाला.

कोंढणपूर ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांनी सरपंच तृप्ती नवनाथ मुजुमले यांच्याविरोधात तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे अविश्वासाच्या ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता. बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी कारभार करणे, सदस्यांना माहिती न देणे अशी कारणे या अविश्वास प्रस्तावात मांडली होती.

सोमवारी (ता. २०) दुपारी बारा वाजता कोंढणपूर ग्रामपंचायत कार्यालयात या अविश्वास ठरावावर कामकाजास सुरवात झाली. अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार किरण सुरवसे उपस्थित होते.

कोंढणपूर ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी या अविश्वास ठरावावर गुप्त पद्धतीने मतदान घेतले. त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने ७ तर अविश्वास ठरावाच्या विरोधात १ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे ७ विरुद्ध १ या फरकाने सरपंच तृप्ती नवनाथ मुजुमले यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला.

"अनेक बेकायदा कामे करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. ती बेकायदेशीर कामे न केल्यामुळे तसेच पदाच्या हव्यासापोटी हा अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यासाठी देण्यात आलेली सर्व कारणे खोटी आहेत. ती मला मान्य नसून याविरोधात वरिष्ठ पातळीवर दाद मागणार आहे."
-तृप्ती मुजुमले, सरपंच कोंढणपूर ग्रामपंचायत