सारथीतर्फे सहा महिन्यांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम

सारथीतर्फे सहा महिन्यांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम

खेड-शिवापूर, ता. २६ : सारथी पुणे तसेच एमकेसीएल पुणे, यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास सारथी व संगणक कौशल्य विकास (सीएसएमएस-डीईईपी) हा सहा महिन्यांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवापूर (ता. हवेली) येथे एमकेसीएलचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ आयटी येथे नुकतीच या प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सदर कार्यक्रमाला सारथीचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक विकास खराटे, एमकेसीएलचे प्रतिनिधी विश्वजीत उत्तरवार, अमित खापरे, श्रीरंग इनामदार, सूरज लेकावळे तसेच गुरुकुल इन्स्टिट्यूटचे संस्थापक दीपक रजपूत या वेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होऊन नवनवीन तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. ही योजना मराठा तसेच कुणबी समाजातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. त्यामुळे खेड-शिवापूर परीसरातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी www.mkcl.org/csms-deep या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन गुरुकुल इन्स्टिट्यूटचे दीपक रजपूत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com