वेळूच्या सरपंचपदी ईश्वर पांगारे

वेळूच्या सरपंचपदी ईश्वर पांगारे

खेड शिवापूर, ता. ३ : वेळू (ता.भोर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ईश्वर बबन पांगारे यांची तर उपसरपंचपदी सुजाता शशिकांत खुंटे यांची बिनविरोध निवड झाली. अमोल बबन पांगारे यांनी सरपंचपदाचा तर संगीता पांगारे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदासाठी हिरामण पांगारे यांचा तर उपसरपंच पदासाठी सुजाता खुंटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हनुमंत वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी उल्हास कोरडे, माऊली पांगारे, जीवन धनावडे, मंगेश सुर्वे आदी यावेळी उपस्थित होते.


01051, 01052

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com