‘राजगड’ नामकरणासाठी  
राज ठाकरे यांना निवेदन

‘राजगड’ नामकरणासाठी राज ठाकरे यांना निवेदन

खेड शिवापूर, ता. ५ : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करावे व खेड-शिवापूर टोलनाका स्थलांतरित करावा, अशी मागणी वेल्हे तालुक्यातील मनसैनिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राज ठाकरे हे शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर चालले असताना खेड शिवापूर टोलनाक्यावर थांबले होते. त्यावेळी भोर, वेल्हे आणि हवेली तालुक्यातील मनसैनिकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी त्यांना निवेदन दिले. विलास बोरगे, दिगंबर चोरगे, अंकुश दसवडकर, रवींद्र घाडगे, गणेश दारवटकर, अशोक चोरगे, तानाजी राजीवडे, अनिकेत व्यवहारे, विनायक लिम्हण, संजय लोखंडे, राहुल वाल्हेकर, दीपक पांगारे, धनंजय टेमगेरे आदी यावेळी उपस्थित होते
‘‘वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे. तसेच, खेड-शिवापूर टोलनाका स्थलांतरित करावा, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे राज ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे दसवडकर यांनी सांगितले.

VEL23B01776

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com