गुरुजींना तयार केले शालोपयोगी सॉफ्टवेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुजींना तयार केले शालोपयोगी सॉफ्टवेअर
गुरुजींना तयार केले शालोपयोगी सॉफ्टवेअर

गुरुजींना तयार केले शालोपयोगी सॉफ्टवेअर

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २७ : नावीन्यपूर्ण उपक्रमाची शिरुरकर गुरुजींची परंपरा कायम राखत कोयाळी-पुनर्वसन शाळेतील शिक्षकांनी कोवीडच्या एक वर्ष कार्यकालात विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठी हजेरी, दफ्तर दिरंगाईवर मात, विविध प्रकारच्या दाखल्यांसह अत्यावश्यक सर्व अभिलेख तसेच दैनंदिन माहितीने परिपूर्ण अशी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) नुकतीच तयार केली. कुठल्याही जिल्हा परिषद शाळेसाठी सहजपणे वापरता येणारी ही संगणक प्रणाली शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या कौशल्याने तयार केली असून केवळ तांत्रिक मदत म्हणून एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीकडून त्यांनी हे काम पूर्ण करून घेतलेले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम निकाल देणारी शाळा म्हणून कोयाळी जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे. या शाळेत १५०० विद्यार्थी असून ३५ शिक्षक कार्यरत आहेत. गेली दोन वर्षे कोवीडमुळे शैक्षणिक अनियमितता होत असताना या काळात शाळेत नियमित येऊन शिक्षकांनी शाळा चालविण्यासाठी येणाऱ्या विविध समस्यांच्या अनुषंगाने काही संगणक पर्याय काढण्यावर चर्चा सुरू केली. त्यातूनच शाळेच्या सर्व समस्यांसाठी एखादे सॉफ्टवेअर बनविण्याची कल्पना पुढे आली. याबाबतीत त्यांना धनंजय एंटरप्रायझेस यांनी तांत्रिक मदत केली वर्षभराच्या अथक प्रयत्नांनी हे सॉफ्टवेअर तयार झाल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष विधाटे व उमेश धुमाळ यांनी दिली. या कामासाठी १ लाख २० हजार एवढा खर्च आला असून ही रक्कम पालकांनी शाळा सुधार योजनेतून उपलब्ध करून दिल्याचे शाळेचे वतीने सांगण्यात आले. या कामी मुख्याध्यापक संतोष विधाटे, उमेश धुमाळ, शरद दौंडकर, अशोक केदार, अनिल गवारे, सीमा ढोबळे व इतर सर्व शिक्षकांनी मदत केली.

या प्रणालीत नेमके काय
शाळा स्थापनेपासून विद्यार्थ्यांची सर्व माहिती, सर्व विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांच्या फोटोसह बोनफाईड सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती, तसेच सर्व शिक्षकांची शासकीय माहिती या अंतर्गत असणार आहे. या संगणकीकृत माहितीसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकास व मुख्याध्यापकांस स्वतंत्र पासवर्ड व लॉगिन आयडी देण्यात आला आहे, सर्व विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी, गैरहजेरी या विषयी पालकांनाही तात्काळ मेसेज पाठवता येणार आहे.

साठ वर्षापूर्वीची कागदपत्रे एका क्लिकवर
साठ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट ते आज शाळेत असलेल्या १५०० पैकी कुठल्याही विद्यार्थ्याचा दाखला मुख्याध्यापक तत्काळ देतील अशी व्यवस्था या सॉफ्टवेअरमुळे झाली आहे. शिक्षकांची सेवाकाल माहितीपासून ते सर्व शासकीय अत्यावश्यक माहिती एका क्लिकवर शाळेतील प्रत्येक शिक्षकाला हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देते.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01339 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top