सणसवाडीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणसवाडीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार
सणसवाडीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार

सणसवाडीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ३० : सणसवाडी ग्रामपंचायतीला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे वतीने आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हिवरे बाजार (जि.नगर) येथे हा पुरस्कार तत्कालीन सरपंच स्नेहल भुजबळ व माजी सरपंच सुनंदा दरेकर यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वीकारला.
माजी मंत्री सुरेश धस, गंगापूर विधानसभा आमदार प्रशांत बंब, आमदार नीलेश लंके, सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सहआयुक्त उज्वल कुमार चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
पुरस्कार स्वीकारताना उपसरपंच सागर दरेकर, माजी उपसरपंच अ‍ॅड. विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकला सातपुते, सुवर्णा रामदास दरेकर, रूपाली दरेकर, संगीता हरगुडे, राजेंद्र दरेकर, दत्तात्रेय हरगुडे, अक्षय कानडे, दीपाली हरगुडे, रामदास दरेकर, ललिता दरेकर, राहुल हरगुडे, ग्रामसेवक बाळनाथ पवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या यशाबद्दल सावता माळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी सरपंच रोहिणी भुजबळ, उद्योजक नवनाथ दरेकर, राजेश भुजबळ, बाबूराव दरेकर, सतीश भुजबळ, संतोष नरके, सुभाष नरके आदींनी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांचा नुकताच जाहीर सन्मान केला.


02033

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01342 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top