शिक्रापूर परिसरात भोंग्याविना अजान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूर परिसरात भोंग्याविना अजान
शिक्रापूर परिसरात भोंग्याविना अजान

शिक्रापूर परिसरात भोंग्याविना अजान

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.५ ः शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीतील नऊ मशिदीमधील अजान तीन दिवसांपासून भोंग्याशिवाय सुरू झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. दरम्यान स्पीकर परवानगी शिवाय कुणीही कुठल्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात स्पीकर लावले तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून अटकेची कारवाईही करणार असल्याचा इशाराही शेडगे यांनी दिला.
शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीतील कोरेगाव-भीमा, शिक्रापूर, तळेगाव-ढमढेरे, पाबळ, केंदूर, मुखई, धामारी, कोंढापुरी, टाकळी-भीमा आदी नऊ गावांमधील दररोज अजान सुरू आहेत. या सर्व गावांमधील मशिदीमधील स्पीकर परवानगी तसेच इतर वेळेची माहिती घेऊन शिक्रापूर पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधव तसेच त्यांचे मौलवी यांना एकत्रित करून बैठका घेतल्या. मुस्लिम बांधवांनीही या एकूणच प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देवून स्पिकरवरील अजान गेल्या तीन दिवसांपासून पूर्ण बंद केल्याची माहिती शेडगे यांनी दिली.
हद्दीतील सर्व मंदिरांची माहितीही शिक्रापूर पोलिस घेत असून स्पीकर व्यवसाय करणारे, डिजे चालक-मालक यांचीही माहिती संकलित करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या डेसिबल मर्यादेच्या निर्णयामुळे त्यांची अंमलबजावणी सामान्य नागरिकांसाठी गरजेची आहे. या पार्श्वभूमिवर हद्दीत डेसिबल उल्लंघन होणार नाही याची पूर्ण दक्षता नागरिकांनी घ्यावी अन्यथा जबाबदार व्यक्ती, संस्था, पुजारी, मौलवी, गुरव, भाविक, लग्न वा तत्सम कार्यक्रम आयोजक यापैकी कुणालाही कारवाईतून सोडले जाणार नसल्याचा इशाराही शेडगे यांनी दिला.

मंदिरांनाही दिली पत्रे

पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व मंदिरे, पुजारी, भाविक, विश्वस्त यांना त्यांच्याकडे स्पीकर परवानगी आहे की नाही, याची चौकशीसाठीची पत्रे पोलिसांकडून दिली गेली आहेत. पोलिसांना प्रतिसाद देवून स्पिकरबाबतच्या अटींचे पालन न केल्यास अटकेसह दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक शेडगे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01352 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top