
पोलिसाचा मुलगा असल्याचे सांगत विनयभंग, मारहाण
शिक्रापूर, ता. ९ : घरभाडे मागणाऱ्या महिलेला व तिच्या पतीला, ‘मी गाववाला आहे आणि पोलिसाचा मुलगा पण आहे,’ असे धमकावत मारहाण करणाऱ्या तरुणावर व त्याच्या साथीदारावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील तुषार परशुराम शितोळे, असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, रविवारी (ता. ८) सकाळी फिर्यादी महिलेने तुषार शितोळे (रा. कोरेगाव भीमा) हा त्याचे सर्व साहित्य घेऊन फिर्यादीच्या घराच्या भाड्याचे पैसे न देता सोडून जात होता. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावर त्याने त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करणे सुरू केले. तसेच, ‘मी गाववाला आहे आणि पोलिसाचा मुलगा पण आहे. तुला जे काय करायचे ते कर,’ असे म्हटले. यावर फिर्यादी महिलेने आपल्या पतीला बोलावून घेत, याबाबतची तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्याला करते, असे म्हणून त्या बाहेर पडल्यात. त्यावर तुषार याने त्याच्या मामाचा मुलगा (नाव माहिती नाही) याला बोलावून घेत फिर्यादी महिला व तीच्या पतीला रस्त्यात मारहाण केली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी तुषार व एक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आदी गुन्हे दाखल केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01354 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..