केंदूरच्या सरपंचपदी अविनाश साकोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंदूरच्या सरपंचपदी अविनाश साकोरे
केंदूरच्या सरपंचपदी अविनाश साकोरे

केंदूरच्या सरपंचपदी अविनाश साकोरे

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. १२ : केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अविनाश काळूराम साकोरे तर उपसरपंचपदी योगिता ज्ञानेश्वर थिटे यांची नुकतीच निवड झाली. सुनील थिटे व जयश्री शहाजी सुक्रे यांनी सरपंच-उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर दोघांची बिनविरोध निवड झाली.
सरपंचपद खुले आल्याने सर्वांना संधी या न्यायाने केंदूर ग्रामपंचायतीत गेल्या वर्षभरात सुवर्णा थिटे व सुनील थिटे यांना सरपंचपदाची तर भरत साकोरे व जयश्री सुक्रे यांना उपसरपंचपदाची संधी दिली होती. गेली ३६ वर्षे गावाला जिल्हा परिषद सदस्यपद मिळाले नसल्याने गावातील राजकीय हेवेदावे संपविण्याच्या दृष्टीने हा निर्णय झाला आहे. त्यानुसार निवड बिनविरोध झाली. या संपूर्ण प्रक्रियेत माजी सभापती सदाशिवराव थिटे, शाहूराज थिटे, विलास थिटे, भाऊसाहेब थिटे, ईश्वर साकोरे, नवनाथ थिटे, सुभाष पऱ्हाड, काळूराम पऱ्हाड, युवराज साकोरे यांनी लक्ष घातल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01357 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top