पोलिस भरती प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणाथ्यास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरती प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणाथ्यास मारहाण
पोलिस भरती प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणाथ्यास मारहाण

पोलिस भरती प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणाथ्यास मारहाण

sakal_logo
By

शिक्रापूर ता.१२ : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणार्थी तय्यब चंद शेख (वय १८, रा.जाधवमळा, रामलिंग रोड, शिरूर) याला जबर मारहाण केल्याप्रकरणी गरुडझेप अ‍ॅकॅडमीच्या दत्ता आंधळे व आनंदा मोरे या दोन प्रशिक्षकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींच्या शोधात पोलिस असून दोघांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
पोलिस भरती प्रशिक्षणासाठी ५ मे रोजी अ‍ॅकॅडमी (पिंपळे-जगताप, ता.शिरूर) येथे तय्यब शेख याने प्रवेश घेतला. ६ तारखेला पहाटे साडेपाच वाजता पिंपळे-जगताप कॅंपसमध्ये पळण्याचा सराव दत्ता आंधळे घेत होते. मैदानावर चार-पाच राउंड पळणे झाल्यावर तय्यब हा थकल्याने तो हळू पळू लागताच आंधळे यांनी त्याला मागून येऊन त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर पीव्हीसी पाईपने जबर मारहाण सुरू केल्याने तो तिथेच पडला. पहिल्या दिवशीच्या या प्रकाराने दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे असाच प्रकार झाला आणि व्यक्तीगत शिवीगाळ करून तय्यब याला पुन्हा उठा-बशा काढायला सांगून दहा राउंड पुन्हा पळायला सांगितले. तिसऱ्या दिवशी मात्र दोन दिवसांच्या प्रकाराने तय्यब आजारी पडला म्हणून त्याने मग वडीलांना हा प्रकार मोबाईलवरून सांगितला.
यावरून वडील चंद शेख गरुडझेप अ‍ॅकॅडमीत आले व त्यांनी झालेल्या प्रकाराचा जाब विचारत, ''तय्यबचा प्रवेश रद्द करायचा आहे. आम्ही भरलेले ६८ हजार ५०० रुपये आम्हाला तत्काळ परत द्या'' असे तेथील आनंदा मोरे यांना म्हटल्यावर शेख यांना मोरे यांनी अरेरावीची भाषा करून शेख पिता-पुत्रांना तेथून बाहेर काढले. यानंतर याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01358 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top