शिरूरच्या शेतकऱ्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या शेतकऱ्यांना दिलासा
शिरूरच्या शेतकऱ्यांना दिलासा

शिरूरच्या शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २२ : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी, निर्वी व केंदूर या चार गावांतील चासकमान व थिटेवाडी प्रकल्प पुनर्वसन राखीव शेरे पडलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार एका वेगळ्या शेऱ्यासह करण्याबाबतच्या सूचना उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी एका स्वतंत्र आदेशानुसार शिरूर तहसील कार्यालयाला दिल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांनी दिली.

चासकमान प्रकल्पासाठी पुनर्वसन राखीव शेरे पडलेल्या तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी, निर्वी व थिटेवाडी प्रकल्पासाठी राखीव शेरे पडलेल्या केंदूर या गावांतील शेतकऱ्यांना जमिनींच्या खरेदी-विक्री, गहाणखत प्रक्रियेसाठी मोठे अडथळे होते. याबाबत ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शासनाने एक स्वतंत्र निर्णय घेऊन त्यात ७/१२च्या इतर हक्कांतील पुनर्वसनासाठी राखीव शेरे कमी करून त्याऐवजी पुनर्वसन नियमांच्या तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतर व्यवहार अनुज्ञय, असा शेरा टाकून संबंधित क्षेत्रांच्या सर्व व्यवहारांना संमती दिली. मात्र, याबाबत महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना फक्त हेलपाटेच मारायला लावून संमती देणे टाळले जात होते. त्यावर ११ मे रोजी शिरूर मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून याबाबत आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यावर उपजिल्हाधिकारी पाटील यांनी स्वतंत्र आदेश तहसीलदार शिरूर यांच्या नावाने काढला. त्यानुसार शेरे पडलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता ‘शेरे हटाव’ आंदोलन
चासकमान प्रकल्पाची वस्तुस्थिती दर्शवून आता संपादन करावयाचे काम संपले असून, शेरे काढण्यास हरकत नसल्याचे पत्र चासकमानने दिलेले असताना हे शेरे न काढण्याचे काम महसूलकडून केवळ आर्थिक लालचेपोटी सुरू आहे. त्यामुळे ‘शेरे हटाव’ हे तीव्र आंदोलन लवकरच शिरूर मनसे करणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01366 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..