शिक्रापूर रोटरीच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूर रोटरीच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे
शिक्रापूर रोटरीच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे

शिक्रापूर रोटरीच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २ ः शिक्रापूर रोटरी क्लब स्थापनेनंतरच्या सात वर्षात ३२ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालयांसह पाच शाळांमध्ये टॅबलेट, अत्याधुनिक प्रयोगशाळा व इतर वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून घेणारे संस्थापक-अध्यक्ष वीरधवल करंजे-पाटील यांना पुन्हा एकदा शिक्रापूर रोटरीचे अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. यावेळी डॉ. मिलिंद भोसुरे यांची सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सर्व शाळांमधील मुलींसाठी व इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या समस्यांचे सर्व्हेक्षण करून शिक्रापूर रोटरीच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून काम सुरू आहे. यात ७४ ई-लर्निंग सेट्स, बारा शाळांमध्ये मुलींची टॉयलेट्स, अकरा शाळांमध्ये पाणी शुद्धीकरण प्रकल्प, पाच शाळांमध्ये ८२ टॅबलेट संगणक, एका शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा, दोन शाळांसाठी दोन उत्तम वर्गखोल्या, कोरोनाकाळात १८०० कुटुंबांना किराणा साहित्य आणि प्रतिवर्षी सर्वरोग शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी उपक्रमांचा समावेश आहे. गेल्या सात वर्षात अनेक अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले असले तरी त्यांच्या बरोबरीने काम करून संस्थापक-अध्यक्ष वीरधवल करंजे यांनी वरील सर्व कामांमध्ये आपले योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमिवर त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करण्याची एकमुखी मागणी झाली आणि त्यानुसार ते पुन्हा एकदा शिक्रापूर रोटरीचे अध्यक्ष झाल्याची माहिती रोटरीचे सदस्य तथा विद्यमान उपसरपंच मयूर करंजे यांनी दिली. यावेळी मावळते अध्यक्ष रमेश भुजबळ व सचिव मनोहर परदेशी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रांतपाल शीतल शहा , सहाय्यक प्रांतपाल विलास काळोखे, आमदार अ‍ॅड. अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, उपसरपंच मयूर करंजे, उपसरपंच रमेश थोरात, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, लध्दाराम पटेल, प्रीतम शिर्के
रवींद्र भुजबळ, डॉ. राम पोटे, डॉ. शरद लांडगे, बाजीराव भाकरे व शिक्रापूर-रोटरीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संजीव मांढरे यांनी प्रास्ताविक केले. तर मयूर करंजे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01425 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..