पाबळ-केंदूरचा संताप मावळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाबळ-केंदूरचा संताप मावळला
पाबळ-केंदूरचा संताप मावळला

पाबळ-केंदूरचा संताप मावळला

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ६ : जिल्हा परिषद गट पुनर्रचनेत शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर गटाचे नाव बदलल्याने दोन्ही गावांसह संपूर्ण गटातूनच तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, नव्याने झालेल्या पुनर्रचनेमुळे आता जुन्याच नावाने होऊ घातलेल्या पाबळ-केंदूर गटाचे या भागातून स्वागत होत आहे. झालेला प्रकार परस्पर प्रशासकीय, राजकीय प्रेरित व अत्यंत निंदणीय होता. मात्र, झालेल्या निर्णयाचे स्वागत या भागातून फटाके वाजवून मोठ्या प्रमाणात होत आहे.
महाविकास आघाडी सरकारने बदलेल्या जिल्हा परिषद गट पुनर्रचनेनुसार शिरूरमध्ये एक जिल्हा परिषद गट वाढला होता. यात पाबळ-केंदूर या जिल्हा परिषद गटाचे नाव बदलून दोन्ही गावांच्या तुलनेत अगदी छोटी गावे असलेल्या करंदी व कान्हूर या गावांचे नाव गटाला दिले होते. त्यामुळे या भागातील नागरिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत केल्या होत्या.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने पूर्वीचा निवडणूक कार्यक्रमच रद्द करून पूर्वीच्या गटांची संख्या कायम ठेवत जिल्हा परिषदेत ७३; तर शिरूरमध्ये पूर्वीच्या सात गटांची व्यवस्था कायम ठेवली. पर्यायाने पाबळ-केंदूर गटाचे नाव आहे तेच राहण्याचाही मार्ग मोकळा झाला. केंदूरचे सरपंच अविनाश साकोरे, उपसरपंच योगिता माऊली थिटे, पाबळचे सरपंच मारुती शेळके यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. बाळासाहेब साकोरे, राज गायकवाड, चंद्रशेखर वारघडे, भाऊसाहेब थिटे यांनी या निर्णयाचे पेढे वाटून व फटाके वाजवून स्वागत केले.

ऐतिहासिक व राजकीय महत्त्व
पाबळ व केंदूर ही दोन्ही गावे सुमारे १५ ते २० हजार प्रत्येकी लोकसंख्येची आहेत. संत ज्ञानेश्वरांचे काका असलेले कान्हूराज पाठक हे केंदूरचे; तर मस्तानीचा रहिवास पाबळचा आहे. त्यामुळे ऐतिहासिक परंपरेची ही दोन्ही गावे आहेत. दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे यांचेही केंदूर हे मुळ गाव आहे. बापूसाहेब थिटे, सदाशिवराव थिटे, भाऊसाहेब साकोरे हे सभापतिपदी; तर राजेंद्र रासकर व सविता पऱ्हाड हे दोघे माजी उपसभापती राहिलेले नेते केंदूरचे आहेत. शिरूरच्या राजकारणात दोन्ही गावांचे स्थान खुपच वरचे आहे. तरीही गटाचे नावच बदलल्याने तीव्र संताप होत होता.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01433 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..