रामा गावडे यांना २० गुंठ्याच्या जागेची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामा गावडे यांना २० गुंठ्याच्या जागेची तरतूद
रामा गावडे यांना २० गुंठ्याच्या जागेची तरतूद

रामा गावडे यांना २० गुंठ्याच्या जागेची तरतूद

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ११ : आतिवृष्टीने बेघर झालेल्या केंदूर (ता.शिरूर) येथील आदिवासी रामा रावबा गावडे यांच्यासह २० आदिवासी बाधवांच्या घरासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडून २० गुंठ्याच्या जागेची तरतूद केली आहे, अशी माहिती सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता माऊली थिटे यांनी दिली.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार (ता. ९) रामा गावडे यांची व्यथा सांगणारे ''मुलाच्या मृत्यूनंतरही आदिवासी बांधव भरपाईच्या प्रतीक्षेत'' या मथळ्याखाली ''सकाळ''ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने गावडे यांना जागेच्या तरतुदीसह आदिवासी तालुक्याच्या धर्तीवर आदिवासी कुटुंबासाठी केंदूरला आदिवासी गावचा दर्जा देण्याची मागणीही शासनाकडे ग्रामपंचायतीचे वतीने करणार असल्याचे सरपंच-उपसरपंचांनी सांगितले.
रामा गावडेसह इतर २० आदिवासी कुटुंबांना गावठाणाजवळील सकस आहार योजनेसाठी राखीव ग्रामपंचयात मालकीच्या क्षेत्रातील २० गुंठे जागा देण्याचा निर्णय जाहीर केला. सदर निर्णय आम्ही यापूर्वीच घेण्याचा विचार करीत होतो. मात्र गावातील आदिवासी कुटुंबांची सद्यःस्थिती पाहता गरजवंत वीस कुटुंबांना घरे बांधण्यासाठी प्रत्येकी एक गुंठा जागा बक्षीसपत्र देण्याचा निर्णय सकाळच्या बातमीनंतर तत्काळ घेत असल्याचेही सरपंच-उपसरपंचांनी सांगितले.

दरम्यान, गावात आदिवासी कुटुंबांची एकूण लोकसंख्या जवळपास २ हजारांचे वर आहे. मात्र केवळ शिरूर तालुका आदिवासी नसल्याने या सर्व आदिवासींना दाखले मिळण्यापासून अडचणी सुरू होतात ते त्यांच्यासाठीच्या एकाही आदिवासी योजनेसाठी ते पात्र ठरत नसल्याचे गंभीर वास्तव आहे.

ठाकरी भाषेची परंपरा अजुनही कायम...!
होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी आदिवासी गाण्यांची परंपरा अजूनही केंदूरच्या ठाकर समाजात कायम आहे. संपूर्ण गाव हे ग्रामीण मराठीची भाषा बोलत असताना याच गावात अगदी पूर्ण मिसळून गेलेल्या आदिवासी ठाकर समाजाची ठाकरी भाषा अजूनही तितक्याच प्रेमाने या समाजाने जपलेली आहे. विशेष म्हणजे गावातील अनेक जण त्यांचेशी आवर्जून ठाकरी भाषेत बोलून संवाद साधण्याचा प्रकारही कौतुकास्पद आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01438 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..