शिरूर औद्योगीक क्षेत्रातील प्रश्‍न सरकारकडे मांडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर औद्योगीक क्षेत्रातील 
प्रश्‍न सरकारकडे मांडणार
शिरूर औद्योगीक क्षेत्रातील प्रश्‍न सरकारकडे मांडणार

शिरूर औद्योगीक क्षेत्रातील प्रश्‍न सरकारकडे मांडणार

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २९ : ‘‘शिरूर तालुक्यातील रांजणगाव-कारेगाव-सणसवाडी आदी भागातील औद्योगिक क्षेत्राची पाहणी लवकरच आपण करणार असून, स्थानिकांच्या नोकऱ्या, स्थानिकांना औद्योगिक कंत्राटे आणि तत्सम प्रलंबीत विषयांबाबत माहिती संकलन करून ती विचारार्थ सरकारकडे देणार आहे,’’ असे आश्‍वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शिरूर तालुक्यातील बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्रातील रोजगार संधी आणि उद्योग क्षेत्रातील औद्योगिक ठेकेदारी याबद्दलचे एक स्वतंत्र निवेदन नुकतेच शिरूर तालुका युवा मोर्चाचे वतीन अध्यक्ष रोहीत बाळासाहेब खैरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्याची प्रत त्यांनी बावनकुळे यांना दिली. त्यावर त्यांनी वरील आश्‍वासन दिले. तसेच, तालुक्यातील सर्व औद्योगिक कामगार, कंत्राटी आणि नियमित कामगार, अभियंता व तत्सम उच्चाधिकारी यांच्या संख्येची माहिती संकलित करण्याबाबतही खैरे व शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, नगरसेवक अमोल बालवडकर, वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव, शिरूर युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस केशव पाचर्णे, शिरूर युवा वॉरियर्सचे अध्यक्ष विशाल इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01451 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..