शिक्षक संघटना ः माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन-अनुदान द्या ‘शिक्षण सेवक योजना रद्द करावी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघटना ः माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन-अनुदान द्या
‘शिक्षण सेवक योजना रद्द करावी’
शिक्षक संघटना ः माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन-अनुदान द्या ‘शिक्षण सेवक योजना रद्द करावी’

शिक्षक संघटना ः माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन-अनुदान द्या ‘शिक्षण सेवक योजना रद्द करावी’

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ८ ः शिक्षण सेवक योजना रद्द करावी, कार्यभार शून्य ठिकाणीच शिक्षकांना अतिरिक्त ठरवावे अशा विविध १४ मागण्यांसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

सदर मागणीपत्रात वरील दोन मागण्यांशिवाय मूल्यांकन पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तत्काळ रोखीने अनुदान द्यावे, वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता वेतन देण्यात यावे, माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन-अनुदान द्यावे, १०, २० व ३० वर्षाच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, एनपीएसमध्ये शिक्षकांना ऐच्छिक कपातीची परवानगी द्यावी, कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांमधील विद्यार्थी संख्या शाळांना जोडली असल्यास ६० व स्वतंत्र किंवा वरिष्ठ महाविद्यालय संलग्न असल्यास ८० असावी, तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे व शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात यावे, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, ११ वी कला शाखेला कमीत कमी २० विद्यार्थी संख्या मान्य करावी, शून्य कार्यभार ठिकाणीच शिक्षकास अतिरिक्त ठरवावे, इयत्ता ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा करून इयत्ता ११ वीच्या वर्ग प्रारंभाची दिरंगाई दूर करावी, अर्धवेळ शिक्षकांना प्रचलित पद्धतीनुसार रोस्टरप्रमाणे पूर्णवेळ पदावर नियुक्त करण्यात यावे. या मागण्यांचा समावेश आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत पोहचविण्याची ग्वाही देशमुख यांनी दिली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे, प्रा. किरण खाजेकर, प्रा. सुंदर लोंढे, कार्यकारिणी सदस्य प्रा. जितेंद्र थिटे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01469 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..