बेपत्ता मुलीचा बापानेच केला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेपत्ता मुलीचा बापानेच केला खून
बेपत्ता मुलीचा बापानेच केला खून

बेपत्ता मुलीचा बापानेच केला खून

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ३० ः मोठ्या मुलाच्या संगोपनाची काळजी, सात वर्षीय काहीशा मतीमंद मुलीचा वैद्यकीय खर्च पेलणार नाही आणि तिला आयुष्यभर सांभाळणेही कठीण होईल, ही भीती तिचा पिता युवराज साळुंखे याला वाटत होती. याच भितीपोटी दोनच दिवसांपूर्वी शिक्रापूरातून बेपत्ता झालेल्या अपेक्षा साळुंखे हिचा पोत्यात घालून नदीत टाकून खून केल्याचा गुन्हा शिक्रापूर पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला.
प्राथमिक तपासात मतीमंद मुलीला सांभाळणे कठीण होत असल्याने घरातील आर्थिक मेळ बसत नसल्याने तिला नदीत फेकल्याच्या गुन्ह्याची कबुली आरोपी युवराज साळुंखे याने दिल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी आपल्या राहत्या घरातून अपेक्षा ही बेपत्ता झाल्याचे तिच्या आईने शिक्रापूर पोलिसांना कळविले होते. सध्या मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा असल्याने अनेकांनी तसेच तर्कवितर्क मांडले. शिक्रापूर पोलिसांनी मात्र अपेक्षाच्या घराजवळील सीसीटिव्ही फुटेज पाहणे सुरू करताच ती तिचा पिता युवराज साळुंखे (वय ३०, रा.बजरंगवाडी, शिक्रापूर) याच्याबरोबर बाहेर गेल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर युवराज याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अपेक्षा हिला आपणच पोत्यात घालून पुणे-नगर महामार्गावरील वेळनदीत टाकून दिल्याची माहिती दिली.
-----------------------------
हलाखीच्या परिस्थितीमुळे उचलले पाऊल
---------------------------
दरम्यान ११ वर्षीय मोठ्या मुलाचे संगोपन, मृत अपेक्षा ही काही प्रमाणात मतीमंद असल्याने तिचा वैद्यकीय खर्च आणि तिला आयुष्यभर सांभाळण्याचा भार पेलता येणार नसल्याच्या भीतीने युवराजने तिला पोत्यात घालून नदीत टाकून दिले. युवराज व त्याची पत्नी हे दोघेही मजुरी करुन जगत असल्याने युवराजने हे क्रूर पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे तपास अधिकारी नितीन आतकरे व पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. दरम्यान, अपेक्षाला ज्या पोत्यात भरून नदीत फेकले त्या पोत्यासह अपेक्षाचा शोध शिक्रापूर पोलिसांना लागलेला नसून नदीच्या पुरात शोध सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
----------------------
अपेक्षा युवराज साळुंखे