शिक्रापूर येथील हवालदार लाच मागितल्याने निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूर येथील हवालदार
लाच मागितल्याने निलंबित
शिक्रापूर येथील हवालदार लाच मागितल्याने निलंबित

शिक्रापूर येथील हवालदार लाच मागितल्याने निलंबित

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ३ : फसवणुकीच्या तक्रार अर्जावरून तपास करण्याऐवजी तक्रारदाराकडेच पैशांची मागणी केली म्हणून शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस ठाण्यामधील पोलिस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले.
एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये एक व्यक्ती आला होता. या प्रकरणाची चौकशी पोलिस हवालदार चमानशेख यांच्याकडे वरिष्ठांकडून देण्यात आली. मात्र, या प्रकरणी त्यांनी कुठलीच कार्यवाही न करता उलट तक्रारदाराकडेच पैशांची मागणी केल्याची तक्रार थेट डॉ. देशमुख यांच्याकडे तक्रारदारांनी केली होती. याबाबत पुरावा म्हणून त्यांनी एक ऑडिओ क्लीपही सादर केली होती. या सर्व प्रकरणात शेख यांचे संशयास्पद वर्तन आणि आर्थिक लाभाच्या आमिषाने व अन्य कुठल्याही योग्य कारणाशिवाय तक्रार अर्ज चौकशी प्रलंबीत ठेवल्याच्या कारणास्तव त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.