बेल्हा-जेजुरी राज्यमार्ग पावसामुळे ३ तास बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेल्हा-जेजुरी राज्यमार्ग पावसामुळे ३ तास बंद
बेल्हा-जेजुरी राज्यमार्ग पावसामुळे ३ तास बंद

बेल्हा-जेजुरी राज्यमार्ग पावसामुळे ३ तास बंद

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.१८ : सोमवारी (ता.१७) रात्री झालेल्या तुफानी पावसाने जेजुरी-बेल्हा रस्त्यावरील धामारी (ता.शिरूर) येथून जाणा-या बेल्हा-जेजुरी महामार्गावरून तब्बल तीन ते चार फूट एवढ्या उंचीचे पाणी वाहिले. रात्री दीडच्या सुमारास तर तब्बल तीन तास हा संपूर्ण रस्ताच वाहतुकीसाठी बंद राहिला.
रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेल्या या भागातील पावसाने साडेदहा ते अकराच्या सुमारास आक्राळ-विक्राळ रुप धारण करीत प्रचंड वीजेचा कडकडाट आणि धुव्वाधार पावसाने धामारीत नुसता पावसाचा धूर झाला. तब्बल तीन तासांच्या या जब्बर पावसाने संपूर्ण धामारीत पाणीच पाणी झाले होते. याचा पुढचा परिणाम असा झाला की, तब्बल चार फुटांपर्यंत उंचीचे पाणी गावातून बाहेर पडताना ते थेट महामार्गावर वाहू लागले. चारही बाजूंच्या पाण्याने आणि जवळच असलेल्या ओढ्याला आलेल्या पुराने या महामार्गावर तब्बल तीन ते चार फुटांपर्यंत उंचीचे पाणी वाहू लागले. काही वाहने पाण्यात जाताना वाचल्याने संपूर्ण वाहतूक रात्री दीड ते पहाटे चार पर्यंत बंद राहिल्याची माहिती माजी सरपंच संपत कापरे यांनी दिली. दरम्यान पहाटे पाणी ओसरू लागल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, परिस्थितीची तातडीने प्रशासनाने पाहणी करून पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच संपत कापरे यांनी केली आहे.