घराच्या टेरेसवर पाळलेली दोनशे कबुतरे पळवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराच्या टेरेसवर पाळलेली
दोनशे कबुतरे पळवली
घराच्या टेरेसवर पाळलेली दोनशे कबुतरे पळवली

घराच्या टेरेसवर पाळलेली दोनशे कबुतरे पळवली

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ८ : एकाच वेळी तब्बल दिडशे ते दोनशे कबुतरे पोत्यात कोंबून पळवून नेल्याची घटना पाबळ (ता. शिरूर) येथे नुकतीच घडली. सर्व कबुतरे पाळीव असून, घराच्या टेरेसवर चढून चोरट्यांनी ही सर्व कबुतरे एका मोटारीत पळविल्याचे सीसीटीव्हीतही कैद झाले आहे.
याबाबत आकाश मनोहर जगताप (रा. पाबळ) यांनी पाबळ औटपोस्ट व शिक्रापूर पोलिसांकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली. त्यानुसार आकाश यांच्या घरावरील टेरेसवर सुमारे दिडशे ते दोनशे कबुतरे पाळली असून, १ तारखेला त्यांच्या टेरेसवर शेजारील एका भिंतीच्या आधाराने काही चोरटे चढले व त्यांनी पोत्यात सर्व कबुतरे कोंबली व ती तशीच एका चारचाकीत टाकून पळून नेली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला. याबाबत सहायक हवालदार विजय चौधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील घटनेला दुजोरा दिला असून, गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.