शिक्रापूरच्या सरपंचांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूरच्या सरपंचांना मारहाण
शिक्रापूरच्या सरपंचांना मारहाण

शिक्रापूरच्या सरपंचांना मारहाण

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २१ : शिक्रापूरचे (ता. शिरूर) सरपंच रमेश गडदे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवीगाळ, दमदाटी करत एका टोळक्याने हाताने मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली.
याबाबत सरपंच गडदे यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी उद्धव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू आदी युवकांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याची व मुख्य आरोपी उद्धव झोडगे याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
सरपंच गडदे हे शनिवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास ग्रामपंचायतीसमोरील हनुमान मंदिराशेजारून जात असताना तिथे उभ्या असलेल्या उद्धव झोडगे यांनी त्यांचा टेंपो (क्र. एमएच १२ आरएन १८९१) महामार्गलगत जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडचण होईल, अशा पद्धतीने उभा केला होता. सरपंच गडदे यांनी झोडगे यांना त्यांचा टेम्पो बाजूला घेण्यास सांगितला. त्याचा राग मनात धरून उद्धव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू या सर्वांनी मिळून गडदे यांना धक्काबुक्की करत जातिवाचक शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली.