शिरूरमधून आदित्य, श्रेयस पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमधून आदित्य, श्रेयस पात्र
शिरूरमधून आदित्य, श्रेयस पात्र

शिरूरमधून आदित्य, श्रेयस पात्र

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ३० : केंदूर (ता. शिरूर) येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या शिरूर तालुका चाचणी कुस्ती स्पर्धेत विविध वजन गटातून एकूण ३५ मल्ल जिल्हा पातळीसाठी पात्र ठरले. महाराष्ट्र केसरी गटातून (खुला वजन गट) अण्णापूर येथील आदित्य बबन पवार (माती विभाग) व श्रेयस अनिल होळकर (गादी विभाग) हे दोघे जिल्हास्तरासाठी पात्र ठरले.
केंदूरचे माजी उपसरपंच संतोष साकोरे, कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष झेंडू पवार व ग्रामस्थांच्या पुढाकाराने या स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्‍घाटन माजी सभापती सुभाष उमाप, शंकर जांभळकर, भाऊसाहेब साकोरे, महाराष्ट्र चॅम्पियन देवराम दरेकर, भगवान शेळके, प्रमोद पऱ्हाड, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी केले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र चॅम्पियन आबासाहेब काकडे, महान महाराष्ट्र केसरी विजय गावडे व दिलीप भरणे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे आदींनी भेटी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यात कुस्तीगीर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ सासवडे, तालुकाध्यक्ष झेंडू पवार, कानिफ गव्हाणे, युवराज निंबाळकर, अप्पा धुमाळ, राजेंद्र भोसले, राजेंद्र शिंदे, गणेश जामदार अनिल काशीद, संतोष साकोरे, गोविंद साकोरे, विलास थिटे, भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे यांनी योगदान दिले.

र्धेत विविध वजन गटातून जिल्हास्तरासाठी कुमार गटातील पात्र मल्ल, त्यांचा वजनगट व गाव कंसात पुढीलप्रमाणे- रुद्र गणेश भोकरे (२५ किलो, कोरेगाव भीमा), शंभुराजे विक्रम ढवळे (२५, वडगाव रासाई), रणवीर तानाजी गव्हाणे (३२, डिंग्रजवाडी), अनुज सुधीर जगताप (३५, वडगाव रासाई), प्रणव चंद्रकांत धुमाळ (३८, पिंपळे खालसा), नितीन राजेंद्र कोळपे (४२, गुनाट), ओंकार अनिल जाधव (४५, न्हावरे), प्रशांत संतोष रूपनवर (४८, गारकोलवाडी), मयूर पंकज थोरवे (५१, मुखई), अनिल संदीप लांबकाने (५३, इनामगाव), राज श्रीकांत शेलार (६०, वडगाव रासाई), साई संभाजी उमाप (६५, जातेगाव बुद्रुक), साई अनिल जाधव (७१, न्हावरे), ओम संदीप साकोरे (८०, केंदूर), संस्कार नीलेश येलभर (९२, मोटेवाडी).

माती विभाग- गौरव राजेंद्र गव्हाणे (५७, अण्णापूर), समर्थ प्रदीप पांडे (६०, मुखई), प्रतीक शिवाजी शिंदे (६५, बाभूळसर खुर्द), आदित्य सुनील जाधव (७०, न्हावरे), शुभम ज्ञानदेव काळे (७५, निमोणे), नीलेश अबू पवार (७९, न्हावरे), रविकुमार तानाजी गव्हाणे (८६, कुरुळी), अजित नबाजी पवार (९२, अण्णापूर), ज्ञानेश्वर संदीप येलभर (९५, मोटेवाडी), आदित्य बबन पवार (८६ ते १२५ किलो गट, अण्णापूर).

गादी विभाग- राहुल यशवंत हरगुडे (५७, सणसवाडी), संजय नानासाहेब कोळपे (६१, गुनाट), सागर सोपान कानगुडे (६५, आपटी), आबा सिद्धा शेडगे (७०, न्हावरे), साई राजू चौघूले (७४, निमोणे), आकाश नबाजी पवार (७९, अण्णापूर), उलदीप संतोष इंगळे (८६, दहिवडी), अमोल साहेबराव धुमाळ (९२, धुमाळवाडी), ओंकार संतोष येलभर (९७, मोटेवाडी) व श्रेयस अनिल होळकर (८६ ते १२५, जातेगाव बुद्रुक)