शिक्रापूर येथे आठ वर्गखोल्यांचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूर येथे आठ वर्गखोल्यांचे उद्‌घाटन
शिक्रापूर येथे आठ वर्गखोल्यांचे उद्‌घाटन

शिक्रापूर येथे आठ वर्गखोल्यांचे उद्‌घाटन

sakal_logo
By

शिक्रापूर ता.१९ : कोयाळी-पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेच्या आठ वर्गखोल्यांचे उद्‌घाटन नुकतेच आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडले. मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कार्यक्रमात वर्ग खोल्यांबाबतीत भरीव योगदान असलेल्या जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे या अनुपस्थित राहिल्याने अनेक राजकीय तर्कवितर्कांना तोंड फुटले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे होते.
यावेळी उपसरपंच विशाल खरपुडे, सुभाष खैरे, मयूर करंजे, रमेश थोरात, आबासाहेब करंजे, सोमनाथ भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, पूजा भुजबळ, गणेश लांडे, नानाभाऊ गिलबिले, अविनाश करंजे, सोनल सोनवणे आदी उपस्थित होते.
येथील कोयाळी-पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेच्या आठ वर्गखोल्यांचे उद्घाटन झाले. त्यात दोन वर्गखोल्या लोकवर्गणीतून, चार वर्गखोल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून, तर दोन वर्गखोल्या जिल्हा परिषद सदस्या मांढरे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद फंडातून बांधल्या गेल्या. कार्यक्रमाच्यावेळी कुसुम मांढरे त्यांचे पती बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे हे दोघेही उपस्थित नसल्याने अनेक तर्कवितर्क चर्चिले जात आहेत. कुसुम मांढरे व आबाराजे मांढरे यांना निमंत्रण देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना निमंत्रण दिले होते, असे मुख्याध्यापक अशोक बगाटे यांनी सांगितले.

योग्य वेळी बोलेनच थोडे दिवस थांबा : कुसुम मांढरे
आपल्या अनुपस्थितीबद्दल बोलताना कुसुम मांढरे म्हणाल्या की, मी अनुपस्थित होते, याबद्दल संपूर्ण पालकवर्गातून मोठ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र थोडे दिवस थांबा मी बोलणारच आहे, असे सांगत मांढरे यांनी आपल्या पुढील भूमिकेबद्दल गूढ निर्माण केले आहे.