अन्‌ घडली बिबट्याच्या मायलेकरांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्‌ घडली बिबट्याच्या मायलेकरांची भेट
अन्‌ घडली बिबट्याच्या मायलेकरांची भेट

अन्‌ घडली बिबट्याच्या मायलेकरांची भेट

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.२७ : जातेगाव बुद्रुक (ता.शिरुर) येथील एका शेतात ऊसतोड कामगारांना उसाच्या शेतात तब्बल चार बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र वनविभाग व या भागातील निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी सदर चारही पिलांना सुरक्षित स्थळी हलवून संबंधित मादीच्या वावर असलेल्या ठिकाणी ठेवून मादी-पिलांची भेट घडवून आणली.
जातेगाव बुद्रुक येथील सुरेश इंगवले यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना तेथील कामगारांना अचानकपणे बिबट्याची अत्यंत लहान पिल्ले इकडून तिकडे भरकटल्यासारखी फिरत असतानाचे दिसून आले. घाबरलेल्या ऊसतोड कामगारांनी याबाबत इंगवले यांना शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर माहिती दिली. यामुळे वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, संचालक दत्ता कवाद, अमोल कुसाळकर, पूजा बांगर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या ठिकाणी बिबट्याची चार पिल्ले दिसून आली मात्र, त्यातील एक पिल्लू मृत झाल्याचेही दिसून आले. रात्र झाल्याने निसर्ग वन्यजीव संस्थेसह वनविभागाच्या कर्मचा-यांनी तीनही बिबट पिले मादी विहाराच्या मार्गात सुरक्षितपणे ठेवले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ही तीन पिले जागेवर दिसली नाही व मादी बिबट्याचाही वावर निसर्ग वन्यजीव संस्थेसह वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना दिसल्याने बिबटपिलांची मादी पुनर्भेट झाल्याचे निष्पन्न झाले.

सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, ग्रामपंचायत राहुल पवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगवले, राहुल क्षीरसागर, सुनील वारे, रतिकांत उमाप, सुरेश इंगवले यांनी वनखात्याच्या मार्गदर्शनाखाली बिबट पिले सुरक्षित ठिकाणी ठेवले. मृत बछड्याचे शवविच्छेदन व पुढील कार्यवाहीसाठी ते शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालय येथे पाठवून देण्यात आले.

02499