नवोदय विद्यालयासाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन

नवोदय विद्यालयासाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन

शिक्रापूर, ता. २ ः केंद्र सरकारच्या पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील नवोदय विद्यालयासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी इयत्ता सहावीसाठीचे प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन (https://navodaya.gov.in) उपलब्ध करुन दिल्याची माहिती प्राचार्य बी. आर. खेडकर यांनी दिली. एकूण ८० विद्यार्थी या प्रक्रियेतून भरले जाणार असून, पात्रता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत निवासी शिक्षण येथे दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


सदर परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा चालू वर्षात इयत्ता पाचवीत शिकत असल्याचा मुख्याध्यापकांचा दाखला अर्जात अपलोड करावा लागत असल्याने हा दाखला अर्जदारांच्या पालकांनी काढून घ्यावा. अर्ज हा त्या-त्या विद्यालयांमधून, तसेच कुठल्याही महा-ई-सेवा केंद्रातून करता येणार असून, परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दरवर्षी साधारण १२ ते १४ हजार एवढ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करीत असतात. अर्ज करण्याची मुदत ही ३१ जानेवारी २०२३ असून, परीक्षा ही २९ एप्रिल २०२३ रोजी विद्यार्थ्यांच्या त्या-त्या भागांतील केंद्रांमध्ये होणार आहेत. केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धती असल्याने आपले अर्ज लवकर अर्ज भरल्यास साइट हॅंग न होता अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरळीत होणार असल्याने विद्यार्थी-पालक व मुख्याध्यापकांनी इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्याचे आवाहन प्राचार्य खेडकर यांनी केले आहे.
----------------------
विद्यार्थिनींसाठी राखीव जागा
पुणे जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या येथील नवोदय विद्यालयात सहावी ते दहावीपर्यंत प्रत्येकी ८० विद्यार्थ्यांची क्षमता असून, यातील १/३ जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. क्षमतेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण व्यवस्था विद्यालयाच्या ३० एकर विस्तीर्ण परिसरात केलेली आहे. याशिवाय इयत्ता अकरावी-बारावीसाठी हीच क्षमता ४० ने कमी करुन प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थी शिकत असल्याने चांगल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी ही चांगली शिक्षण संधी असल्याचेही प्राचार्य खेडकर यांनी सांगितले.
----------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com