पाबळ रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाबळ रुग्णालयासाठी 
आंदोलनाचा इशारा
पाबळ रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशारा

पाबळ रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २३ : पाबळ (ता. शिरूर) येथील बंद ग्रामिण रुग्णालय सुरू करण्यासाठी पाबळ येथील श्रीमंत बाजीराव-मस्तानी सांस्कृतिक प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून, येत्या २८ तारखेपासून (शुक्रवार) रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामिण रुग्णालयापुढेच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करीत असल्याची माहिती अध्यक्ष संजय डहाळे, खजिनदार राज गायकवाड, उपाध्यक्ष महंमद इनामदार, सहसचिव चंद्रशेखर वारघडे, डॉ. संजय घोडेकर यांनी दिली.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पुणे, जिल्हा पोलिस अधिक्षक, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्रापूर पोलिस स्टेशन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अशोक पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पाठविल्या आहेत.