मुखईत पर्यावरण संवर्धन अन्‌ मतदान जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुखईत पर्यावरण संवर्धन अन्‌ मतदान जागृती
मुखईत पर्यावरण संवर्धन अन्‌ मतदान जागृती

मुखईत पर्यावरण संवर्धन अन्‌ मतदान जागृती

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.२८ : मुखई (ता.शिरूर) येथे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार
शिबिर पार पडले. तब्बल सात दिवसांच्या या भरगच्च शिबिरादरम्यान महिला सक्षमीकरण, वाचनसंस्कार, पर्यावरण संवर्धन, कृषी जागरूकता, मतदान जागृती, अन्नसुरक्षा, जैव ऊर्जा, जनधन योजना, जलसंवर्धन, कायद्याची ओळख, कृषी पर्यटन आणि ग्रामीण आरोग्य या चतुरस्र विषयांना विद्यार्थ्यांकरवी न्याय देण्यात आला.

मुखईतील संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल येथे प्रारंभ झालेल्या या शिबिराचे दरम्यान शाळा स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, गावांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सुधीर ढमढेरे, अ‍ॅड.रोहन शेट्टी, डॉ. श्वेतांबरी ढमढेरे, डॉ.सुयोग ढमढेरे, डॉ.आशिष पुराणिक, डॉ.शिवाजी पाचरणे, डॉ.रोहिणी होनप, डॉ.अमित गोगावले, अ‍ॅड.पांडुरंग थोरवे आदी मान्यवरांची व्याख्याने पार पडली. आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, बिहार विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ.पंडित पलांडे आदींचेही विशेष विषयपर मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना झाले.

ग्रामीण राहणीमानाचा मनसोक्त अनुभूती
वनराई, चिकूची बाग, सफरचंदाची बाग, कृषी पर्यटन या तीनही विषयांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुखई पंचक्रोशीची शिवारफेरी व शिवार अभ्यास संपूर्ण विद्यार्थी चमुने शिबिरादरम्यान केला. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी गावातील काही घरी रहिवासी करून ग्रामीण राहणीमानाचा मनसोक्त आनंद व अनुभूती घेतली.

समारोप प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष तथा नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे, बबनराव पलांडे, खुशालराव पलांडे, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के.डी.भोसले, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे, सदाशिवराव मोरे, अजित चव्हाण, माऊली पलांडे, डॉ. प्रिया चोपडे, वर्षा रामगुडे, महेंद्र शानुर आदी मान्यवरांनी समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगूज केले व सर्वांना निरोपही दिला.
02657