जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत रंगत
जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत रंगत

जिजामाता बॅंकेच्या निवडणुकीत रंगत

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २० : जिजामाता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, त्यांच्या पत्नी रेखा बांदल व शिरूर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे हे उतरले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार व जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य पंडित दरेकर हे दोघे बिनविरोध विजयी झाले होते. यावेळी मात्र सुजाता पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत.
सुमारे २२ हजार सभासद मतदार असलेल्या पुण्यातील जिजामाता सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक १५ एप्रिल रोजी आहे. ही निवडणूक १३ संचालक रिक्त जागांसाठी होत असून, एकूण १२ शाखांपैकी ३ शाखा शिरूर, शिक्रापूर व मांडवगण फराटा येथे कार्यरत आहेत. एकूण मतदारांपैकी ६५०० मतदार शिरूरचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक शिरुरकरांसाठीही महत्त्वाची आहे. एकूण १३ पैकी ८ जागा या महिला संचालकांच्या
मागील वेळी २५ किलोमीटर कक्षेबाहेरील महिला संचालक म्हणून सुजाता पवार या माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या माघारीने बिनविरोध; तर खुल्या वर्गातून पंडित दरेकर हे निवडून गेले होते. यावेळी मात्र निवडणुकीत राजकीय रंग भरला असून यात बांदल व मांढरे यांच्या उमेदवारीमुळे राजकारण ढवळून निघणार आहे. आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेले विद्यमान संचालक जाकिरखान पठाण व सणसवाडीचे पंडित दरेकर यांचे बंधू उत्तम दरेकर यांनी अनुक्रमे ओबीसी व खुल्या गटातून अर्ज भरले आहेत.

काका खळदकर पुन्हा रिंगणात
आमदार अशोक पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून तालुक्यात ओळखले जाणारे काका ऊर्फ ज्ञानदेव खळदकर यांनी या निवडणुकीत पहिल्यांदाच आपली पत्नी संगीता खळदकर यांना उतरविले आहे. घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत काका खळदकर यांचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे शिरूरमध्ये राजकारणही चांगलेच रंगले होते.