जिजामाता बॅंकेत सत्ता परिवर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजामाता बॅंकेत सत्ता परिवर्तन
जिजामाता बॅंकेत सत्ता परिवर्तन

जिजामाता बॅंकेत सत्ता परिवर्तन

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २१ : जिजामाता सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाशी संबंधित राजमाता पॅनेलचा एकहाती धुव्वा उडवीत राजमाता जिजाऊ पॅनेलने सत्ता परिवर्तन केले. विशेष म्हणजे शिरूरमध्ये बांदल-मांढरे-पाचुंदकर विरोधात आमदार अशोक पवार समर्थक पॅनेल, अशी थेटपणे लढत झाली आणि पवार यांच्यावर वरील त्रयींनी मात केली.
जिजामाता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १३ सभासदांसाठी २२ हजार मतदारांच्या मतदानावर निकाल लागणार होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ ६९६१ एवढेच मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता होती. शिरूरच्या ८ उमेदवारांमुळे शिरूरभोवतीच केंद्रित झालेल्या या निवडणुकीत निकालही धक्कादायक लागले. या निवडणुकीत आमदार पवार यांचे कट्टर विरोधक मंगलदास बांदल आणि बांदल यांचे कट्टर विरोधक आबाराजे मांढरे व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी एकत्रित मोट बांधली होती. त्यात पवार यांना धोबीपछाड दिली.

राजमाता जिजाऊ पॅनेलचे विजयी उमेदवार : सर्वसाधारण महिला गट : सुजाता जगताप, प्रणिता पठारे, मंगला भोजने, रत्नमाला म्हस्के, पूजा वांजळे, सुनीता शितोळे, सुरेखा शितोळे, सुरेखा शेलार व रेखा बांदल. खुला गट : आबाराजे मांढरे. अनुसूचित जाती जमाती गट : अशोक काकडे. इतर मागास वर्ग गट : जाकिरखान पठाण. विमुक्त जाती-भटक्या जमाती गट : मनिषा कालेवार.

लक्षवेधी हार-जीत
गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदा राजकीय वैर विसरुन आमदार अशोक पवार यांच्यासोबत उतरलेले भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष काका खळदकर यांच्या पत्नी संगीता खळदकर यांच्या विरोधात बांदल-मांढरे अपापसातील राजकीय वैर विसरले व रेखा मंगलदास बांदल या विजयी झाल्या. गेली कित्येक वर्षे अशोक पवार यांचे शिरूर शहरातील कट्टर समर्थक म्हणून जाकिरखान पठाण यांची ओळख होती. मात्र, या निवडणुकीत तेही पवार यांच्या विरोधात गेले अन् त्यांनी अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी संचालक पंडित दरेकर यांच्या भावजय सुनीता उत्तम दरेकर यांचा पराभव केला.