सणसवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा दरेकर बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणसवाडीच्या सरपंचपदी 
सुवर्णा दरेकर बिनविरोध
सणसवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा दरेकर बिनविरोध

सणसवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा दरेकर बिनविरोध

sakal_logo
By

सणसवाडी, ता. २१ : सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर यांची बिनविरोध निवड झाली.
सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर यांच्या राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी एकमेव अर्ज आल्याने सुवर्णा दरेकर यांना सरपंचपदाची संधी मिळाली. या संपूर्ण निवड प्रक्रियेत माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, अ‍ॅड. विजयराज दरेकर, पंडित दरेकर, युवराज दरेकर, दत्तात्रेय हरगुडे यांच्‍यासह सर्वच गावकारभाऱ्यांनी विशेष लक्ष घातल्याने निवडणूक शांततेत पार पडली.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर दरेकर यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात सत्कार सोहळा झाला. यावेळी मनसेचे रामदास दरेकर, सुहास दरेकर, भाजपचे बाबासाहेब दरेकर, अनिल दरेकर, प्रशांत दरेकर, संभाजी साठे, वैभव यादव, गोरक्ष दरेकर, गोरक्ष भुजबळ, सतीश दरेकर, देवराम दरेकर, साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या माजी सरपंच संगीता हरगुडे, सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ, उपसरपंच दत्तात्रेय हरगुडे, राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते, रूपाली दरेकर, ललिता दरेकर, दीपाली दरेकर, अक्षय कानडे, रामदास खुशाल दरेकर यांचा सन्मान करण्यात आला.
सणसवाडी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, कचरा प्रकल्प व महिला व बालकांचा सर्वांगीण विकास, युवकांना रोजगार हा प्राधान्यक्रम असणार असल्याची माहिती नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा दरेकर यांनी दिली.