कोयता बाळगणारा कान्हूर येथे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयता बाळगणारा 
कान्हूर येथे जेरबंद
कोयता बाळगणारा कान्हूर येथे जेरबंद

कोयता बाळगणारा कान्हूर येथे जेरबंद

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २६ : राजगुरुनगर (ता. खेड) येथील श्रीराम होले या युवकाला धारदार कोयत्यासह पाबळ (ता. शिरूर) पोलिसांनी गुरुवारी (ता. २५) मध्यरात्री वरातीतून अटक केली.
याबाबत पाबळ पोलिसांनी माहिती दिली की, गुरुवारी मध्यरात्री कान्हूर येथील डुबीवस्तीवर राहणारे नाथा गेणभाऊ मिडगुले यांच्या मुलाच्या वरातीदरम्यान मिडगुले यांच्या घराजवळ एक व्यक्ती धारदार शस्त्रासह लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन चौधर यांच्यासोबत पोलिस शिपाई राहुल वाघमोडे हे तत्काळ तेथे पोचले. तेथे श्रीराम संतोष होले (वय २९, रा. होलेवाडी, ता. खेड) हा धारदार कोयता घेऊन लपून बसलेला आढळला. त्याला तेथेच जेरबंद केला. त्याच्यावर बेकायदा घातक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला.त्याच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने फार माहिती दिली नसली, तरी तो नेमका कुणावर हल्ला करणार होता आणि त्याचे साथीदार कोण-कोण आहेत, याचा तपास शिक्रापूर पोलिस करीत असल्याची माहिती सहायक फौजदार विजय चौधर यांनी दिली.