Sat, Sept 23, 2023

तालुकाध्यक्ष निवडीच्या
मुलाखती अचानक रद्द
तालुकाध्यक्ष निवडीच्या मुलाखती अचानक रद्द
Published on : 2 June 2023, 1:58 am
शिक्रापूर, ता. २ : शिरूर भाजपच्या तालुकाध्यक्षपदाच्या निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम गुरुवारी (ता. १) लोणीकंद (ता. हवेली) येथे आयोजित केला होता. तो अचानकपणे रद्द केला. तब्बल वीसच्या वर इच्छुकांनी आपापली मुलाखतीसाठीची तयारी करून ठेवली असताना कुठे माशी शिंकली, याचा अंदाज कुणालाच लागला नाही.
दरम्यान, मजबूत संघटनेचा दावा करून पक्षांतर्गत गटबाजीने थेट पक्षालाच धोका देणाऱ्या शिरूरमधील अनेक गटतटांमधील राजकारणाच्या अनुषंगाने असलेली दोन-दोन तालुकाध्यक्षांच्या निवडीबाबतचे वृत्त गुरुवारी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होती. त्यात पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचे उद्योग मांडले होते.