सणसवाडीत तोतया पोलिसांनी 
ज्येष्ठ नागरिकाला लुटले

सणसवाडीत तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले

Published on

सणसवाडी, ता. १९ ः येथील भारत गॅस कंपनीच्या रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास पोलिस असल्याची बतावणी करून त्याच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात दोन चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी रामदास दरेकर (वय ७१) यांच्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता.शिरुर) येथील रामदास दरेकर हे आपल्या दुचाकीतून सणसवाडी चौकातून भारत गॅस कंपनीच्या रस्त्याने चाललेले असताना रस्त्यामध्ये दोघा इसमांनी त्यांना थांबविले. आम्ही पोलिस असून बाजूच्या कंपनीत चोरी झाली असून आम्हाला तुमची झडती घ्यायची असल्याचे सांगितले. त्यांच्याजवळील पाकीट, मोबाईल, गळ्यातील सोन्याची चैन रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार दरेकर यांनी कृती केली असता, काही वेळातच या वस्तु लपेटलेला रुमाल पुन्हा रामदास यांच्या हातात देऊन दोघेजण निघून गेले. दरम्यान रामदास यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये ठेवलेली पाच तोळे वजनाची सोन्याची चैन या तोतया पोलिसांनी लांबवल्याचे लक्षात आले. याबाबत रामदास बबन दरेकर (वय ७१, रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com