
कमलताईंकडून शेतकरी महिलांचा सन्मान
कमलताईंकडून शेतकरी महिलांचा सन्मान
खेड तालुक्यातील कुरुळी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षा कमलताई भरतशेठ कड यांची ओळख शेतकरी महिलांना सन्मान देणाऱ्या व्हाइस चेअरमन’ म्हणून झाली आहे. सामाजिक वारसा जपत त्यांची राजकीय कारकीर्द सुरू आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत त्यांचे समाजकारण आणि राजकारण सुरू आहे. त्यांच्यातील कर्तृत्ववान महिलेची छबी कधीच लपून राहिली नाही. त्यांचे सामाजिक कामही तेवढेच मोठे आहे.
कमलताई भरतशेठ कड, उपाध्यक्षा,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, कुरुळी (ता. खेड)
स्त्रीच्या प्रेमाची, कर्तृत्वाची, त्यागाची जाणीव कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात असते. मात्र, स्त्री याबाबत कधीच बोलत नाही. माहेरचा उंबरठा ओलांडला की स्त्री सासरी जाते. आपल्या घरातल्या माणसांपासून दूर जाते. आईवडील, भावंडांपासून दूर येत पतीच्या घरात रमते आणि त्या घरचीच होऊन जाते. खेड तालुक्यातील कुरुळी येथील कमलताई भरतशेठ कड या जणू गृहलक्ष्मीच ठरल्या आहेत. त्यांच्या अस्तित्वाने घरात चैतन्य निर्माण झाले. त्यांच्या हातून जादू घडली आणि घराचे नंदनवन झाले. मुलांचे संगोपन करताना, त्यांना शिस्त लावताना, त्यांच्यावर संस्कार करताना त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कमलताई भरतशेठ कड यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तसेच, घरात समाजकारण आणि राजकारणाची आवड आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेल्या कमलताई यांना घरची जबाबदारी पार पाडत असताना सन २०१५ मध्ये कुरुळी येथील कडवस्ती जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्यपद मिळाले. ही जबाबदारी पार पाडत असताना सन २०१६ मध्ये त्या कुरुळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालिका पद मिळाले. तसेच, १० डिसेंबर २०१७ रोजी निघोजे येथे पार पडलेल्या शिवार साहित्य संमेलनात कृषी बळीराजाचा सन्मान हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे सन २०२१ मध्ये म्हाळुंगे पोलिस चौकीच्या महिला दक्षता समितीचे सदस्यपद मिळाले. आता त्यांची नुकतीच दुसऱ्यांदा कुरुळी विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली आहे. सर्व संचालक मंडळाने त्यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड केली आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांनी विशेषतः शेतकरी महिलांचा सन्मान केला.
कमलताई कड यांनी सामाजिक व राजकीय जबाबदारी पार पाडत असताना आपल्या घराची जबाबदारी कधी नाकारली नाही. घर सांभाळून त्याही जबाबदारी पार पाडत आहेत. मुलांचे संगोपन करताना, त्यांना शिस्त लावताना, त्यांच्यावर संस्कार करताना त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. कोणतीही मोठी अपेक्षा न ठेवता गृहिणी म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच पतीच्या व मुलांच्या पाठीशीही ठामपणे उभ्या राहिल्या.
Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00532 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..