आर्यन, विराज, रिद्धी यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यन, विराज, रिद्धी यांची निवड
आर्यन, विराज, रिद्धी यांची निवड

आर्यन, विराज, रिद्धी यांची निवड

sakal_logo
By

कुरुळी, ता. ९ नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघासाठी उत्कृष्ट खेळाडूची निवड करण्यात आली. २३ व्या टेनिस हॉलीबॉल या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कुरुळी (ता. खेड) येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आर्यन मेदनकर, विराज मुऱ्हे, रिद्धी गायकवाड या खेळाडूंची पुणे जिल्हातून निवड झाली आहे.
या खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका सरला रेवगडे यांचे सहकार्य मिळाले तसेच शारीरिक शिक्षण महामंडळाचे समन्वयक काळभोर, क्रीडा शिक्षिका व प्रशिक्षक प्रियांका लवटे व हर्षदा नळकांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शरद मुऱ्हे, सरपंच कविता गायकवाड, माजी उपसरपंच नगिना मेदनकर, एम.के.मुऱ्हे, उद्योगपती दीपक मुऱ्हे, नारायण मुऱ्हे, दीपक मेदनकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

01097

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00549 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top