निघोजे सोसायटीच्या अध्यक्षपदी सत्यवान येळवंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निघोजे सोसायटीच्या अध्यक्षपदी सत्यवान येळवंडे
निघोजे सोसायटीच्या अध्यक्षपदी सत्यवान येळवंडे

निघोजे सोसायटीच्या अध्यक्षपदी सत्यवान येळवंडे

sakal_logo
By

कुरुळी, ता. ११ ः निघोजे (ता. खेड) येथील निघोजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे यांच्या श्रीनाथ महाराज शेतकरी सहकारी पॅनेलने बहुमत मिळविले. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवडणूक निर्णय अधिकारी एस. लादे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
यावेळी अध्यक्ष पदासाठी सत्यवान येळवंडे व उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब भंडलकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. लादे, सचिव चंदन पानसरे यांनी दिली.
या निवडणूक प्रकियेत माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे, अमित येळवंडे, कैलास येळवंडे, विकास येळवंडे, यशवंत फडके, जितेंद्र आल्हाट, बेबीताई येळवंडे, मिराबाई मराठे सहभागी झाले होते. येळवंडे, भंडलकर यांची बिनविरोध निवड झाल्यावर
त्यांचा सत्कार माजी सभापती विलास कातोरे, बाळ ठाकूर, अशोक राक्षे, सरपंच परिषद अध्यक्ष आशिष येळवंडे, रामदास येळवंडे, गजानन येळवंडे, ज्ञानेश्वर येळवंडे पाटील, बाळासाहेब येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00551 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top