
कुरुळीत भूमिगत नळ पाणी योजनाचे भूमिपूजन
कुरुळी, ता.१५ : ''''कुरुळी ग्रामस्थांनी आपसांतील भांडण तंटे थांबवा. स्वतःचा व्यवसाय वाढवा. काही वर्षात महापालिका येणार आहे. त्यामुळे गावची प्रगती करून घ्या. विकासासाठी निधी मी उपलब्ध करून देईल,'''' असे आश्वासन आमदार दिलीप मोहिते पाटील दिले.
कुरुळी येथे (ता.खेड) जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनाचे भूमिपूजनप्रसंगी मोहिते बोलत होते. केंद्र व राज्य सरकार जलजीवन मिशन अंतर्गत जल वाहिनी कामासाठी पाच कोटी निधीच्या कामाचा प्रारंभ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुऱ्हेवस्ती येथील अंगणवाडी, ढोलेवस्ती ते बागडेवस्ती सकवापुल, गोसावी समाज स्मशानभूमीजवळ मठ कंपाउंड वॉल बांधकामाचे लोकार्पणही करण्यात आले.
याप्रसंगी माजी सभापती बाळ ठाकूर, राजाराम लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, बैलगाडा विमा कंपनी अध्यक्ष सुदाम मुऱ्हे, माजी उपसभापती अमर कांबळे, सरपंच कविता अजित गायकवाड, उपसरपंच शैला कैलास आंबले, कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, उपअभियंता एबी चाटे, उपअभियंता जयंत कचरे, शाखा अभियंता एस. बि. शिंदे, शाखा अभियंता रितेश मुंडे, शरद मुऱ्हे, सागर मुऱ्हे, विशाल सोनवणे, दीपक डोंगरे, अमोल सोनवणे, नितीन कड, रमेश पवार, शिल्पा सोनवणे, नेहा बागडे, अनिता बधाले, शोभा गायकवाड, वैशाली मुऱ्हे, प्रतिभा कांबळे, विजया गोसावी, कमल कड, सुनीता काळडोके, पोलिस पाटील प्रतिभा कांबळे, मयूर मोहिते, रामनाथ सोनवणे, भरत कड, अजित गायकवाड, एम.के.सोनवणे, देवराम सोनवणे, सचिन कड, एकनाथ सोनवणे, ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल, शशिकांत मोरे, विशाल सोनवणे, अजित गायकवाड, अमित मुऱ्हे, किरण राठोड उपस्थित होते.
एम.के.सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर शरद मुऱ्हे यांनी प्रास्ताविक केले.
01180
Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00591 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..