येवलेवाडीतील कंपनीत जुगार अड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येवलेवाडीतील कंपनीत जुगार अड्डा
येवलेवाडीतील कंपनीत जुगार अड्डा

येवलेवाडीतील कंपनीत जुगार अड्डा

sakal_logo
By

कुरुळी / चाकण, ता. ३ : खेड तालुक्यातील येलवाडी येथील जुगार अड्ड्यावर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने बुधवारी (ता. ३) पहाटे छापा टाकला. या कारवाईत दोन नगरसेवक आणि एका बड्या देवस्थान संस्थानाचे २ आजी-माजी विश्वस्त यांच्यासह जुगार अड्डा मालक कामगारांसह जुगार खेळणारे, अशा २६ जणांच्या विरोधात महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सर्व २६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाला या बाबतची माहिती मिळाली. त्यानंतर देहूगाव ते येलवाडी रोडच्या उजव्या बाजूस एस.एच.ई.पी.एल. हेव्ही इंडस्ट्रिअल फॅब्रिकेशन लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारण्यात आला. या ठिकाणी २६ जण तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. यात नगरसेवक, बड्या धार्मिक संस्थानाचे आजी-माजी विश्वस्त व काही प्रतिष्ठित व्यक्ती, अशा २६ जणांना रात्री उशिरा अटक केली. अटक केलेल्या व्यक्तींकडून दोन मोटारी, १८ दुचाक्या, असा ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याप्रकरणी आरोपी शेखर गुलाब परंदवाड (वय ५०, रा. देहूगाव), विशाल प्रतापसिंह परदेशी, संतोष केशव टिळेकर, संतोष शांताराम कडूसकर, मयूर चिंतामण टिळेकर, विशाल पोपट काळोखे, विशाल केशव मोरे, संतोष गुलाब मोरे, मारुती भीमाजी वाळुंज, अमित अमृत नलावडे, अनिल नागनाथ वाघमारे, विनायक विक्रांत गाडे, संदीप रंगनाथ आव्हाड, राहुल गुलाब येवले, विश्वास दत्तू भिंगारदिवे, राहुल सुभाष कुऱ्हाडे, विजय गोपाळ पडवळ, अमोल युवराज बोरसे, मयूर चंद्रमणी घनवट, योगेश केशव मोरे, सचिन बापू खरात, नवनाथ दशरथ टिळेकर, अप्पा बाळू लोखंडे, मोहम्मद दाऊद सय्यद, मोहन सहादू लोखंडे, भारत नानासाहेब विधाते आदी सव्वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या जुगार अड्ड्यावरील छाप्यात प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याने बुधवारी पहाटेपासून महाळुंगे पोलिस चौकीत मोठी गर्दी झाली होती. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले व पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कांबळे, बनकर, माने, कोकणे, कौशल यांनी केली. याबाबतचा पुढील तपास महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) किशोर पाटील हे करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00622 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..