चिंबळीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंबळीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
चिंबळीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

चिंबळीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

sakal_logo
By

कुरुळी, ता. ११ : चिंबळी (ता. खेड) येथील ‘रेड्डी कस्टम प्रा. लि.’ या कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या नेपाळी टोळीला व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना आळंदी पोलिसांनी पकडले. सोमवारी (ता. ८) चिंबळी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, त्यातील टोळीचा प्रमुख अद्याप फरारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात कोयता व दरोड्याचे इतर साहित्य घेऊन सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास चिंबळी परीसरातील रेड्डी कस्टम कंपनीच्या पत्र्याची सुरक्षा भिंत उचकटण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आवाजाने आसपासच्या नागरिकांनी त्यांना हटकले व तेथून हुसकावून लावले. आरोपींनी तेथून पळ काढला व पुढे त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरु केला. या दरम्यान नागरिकांनी आळंदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी जाताच त्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. नयसिंग ढोली (वय ४८), नीट ढमाई (वय ३२), विशाल ढोली (वय १८), दिनेश ढोली (वय १ ९) यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी मुळचे नेपाळचे असून सध्या लोणी काळभोर येथे राहण्यास आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता, दोन हेक्सा ब्लेड, मिरचीपूड, लोखंडी पान्हा, लोखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, कटर ब्लेड, दोन लॅपटॉप, तांब्याचे केबल, असा एकूण चार ते पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00626 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..