महाळुंगे येथे बाबा महराजांना अभिवादन महाळुंगे येथे बाबा महराज यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाळुंगे येथे बाबा महराजांना अभिवादन
महाळुंगे येथे बाबा महराज यांना अभिवादन
महाळुंगे येथे बाबा महराजांना अभिवादन महाळुंगे येथे बाबा महराज यांना अभिवादन

महाळुंगे येथे बाबा महराजांना अभिवादन महाळुंगे येथे बाबा महराज यांना अभिवादन

sakal_logo
By

कुरुळी, ता.३० : श्री क्षे महाळुंगे (ता.खेड) येथे संत श्री समर्थ सदगुरु श्रीपती बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी महाळुंगे नगरी भक्ती रसात दंग झाली.

यावेळी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. बाबांनी सव्वाशे वर्षापूर्वी  मंदिरामध्ये सुरू केलेला कार्तिकवारी सोहळा व अंखड वीणा, काकडा, आज ही अखंडपणे भक्ती सुरू आहे. पुण्यतिथी निमित्त रात्री ९ ते पहाटे ४ पर्यंत चक्रीभजन होते यामध्ये रायगड भूषण कैलासबुवा पाटील व मंडळी, तसेच भजनसम्राट बाळकृष्णबुवा पाटील व इतरसहकारी, नीता पाटील व सहकारी मंडळ, स्वामी समर्थ भजन मंडळ राजगुरुनगर, व महाळुंगे पंचकृषीतील भक्तगंनानी बाबांच्या चरणी भजनसेवा समर्पित केली. त्या नंतर पहाटे निर्वाण पुष्पाचे कीर्तन संत साहित्याचे गाडे अभ्यासक, वारकरी भूषण सिद्राम महाराज काळे यांनी केले. दरम्यान, सर्व संपूर्ण भारतातून तसेच परदेशातून आलेल्या सर्व भक्तगंनाचे आभार संस्थेचे सर्व कार्यकारी सभासदांनी व ग्रामस्थांनी केले.
रात्री ९ वाजता भव्य नगरप्रदशिणा काढण्यात आली. विशेषकरुन अतिशय भक्तिभावाने कोकण, मुंबई, कर्जत तालुका, रायगड जिल्हा येथून बहुसंख्येने भक्तगण, सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.

01281

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00638 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..